Html comment हा कोड असतो जो web developer ( वेब विकसक )  द्वारे html document मध्ये घातला जातो.

Html document मध्ये code च्या विशिष्ट विभागाबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी html comment लिहिला गेला जातो.

भविष्यात web developer ला html document मध्ये आवश्यक बदल करतांना code चा विशिष्ट विभाग शोधण्यास आणि code वाचणाऱ्याला समजण्यास मदत होते.

आपल्या code मध्ये comments जोडणे ही चांगली पद्धत आहे, विशेषत: जेव्हा आपल्या documents मध्ये बरेच जटिल कोड भरलेले असतात.

Html comment या <! --    --> tag दरम्यान ठेवला जातो. म्हणून, <! --    --> टॅगसह असलेली कोणतीही सामग्री comment म्हणून गणली जाते आणि browser द्वारे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जातो, जेणे करून webpage वर ते comments दिसणार नाहीत.


वाक्यरचना : -

<!-- comment इथे लिहावे  -->



Html Document : -


<!DOCTYPE html>
<html>
<body>
<!--Hello World-->
</body>
</html>


Browser मध्ये code चे निष्कर्ष : -











Post a Comment

Previous Post Next Post