HTML म्हणजे काय?



HTML चे संक्षिप्त आहे "Hyper Text Markup Language" आहे जी Web page आणि Web application तयार करण्यासाठी वापरली जाते. HTML ला 1991 मध्ये “Tim Berners-Lee” यांनी विकसित केले.




चला पाहू HTML मध्ये Hyper Text आणि markup language काय आहे ?


HTML मध्ये, Hyper Text त्या मजकूरला म्हटलं जातं ज्यात link असते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण एखाद्या link असलेल्या मजकूरवर क्लिक करतो तेव्हा तो आपल्याला नवीन webpage वर आणते, त्याचा अर्थ असा की आपण Hypertext क्लिक केले आहे.
Markup language ही संगणकाची भाषा आहे जी दस्तऐवजाचे आराखडा आणि सजावट करण्यासाठी दस्तऐवज मध्ये घटक परिभाषित करण्यासाठी वापरली जाते. HTML ही Markup language आहे.




नुकताच आपण HTML बद्दल शिकलो, आता आपण HTML Document ( HTML दस्तऐवज ) कसे बनवायचे ते शिकू.

HTML Document बनवण्यासाठी दिलेल्या चरणांचे अनुसरण करा: -

चरण 1: - Notepad Text Editor उघडा.


Notepad


चरण 2: - हा HTML code, notepad मधे लिहा.

HTML Document:
<!DOCTYPE html>
<head>
<title>Page Title</title>
</head>
<body>
<h1>Hello World</h1>
</body>
</html>


चरण 3: - HTML code save करा.

HTML save करण्यासाठी, File” वर click करून मग “Save as” चा पर्याय वर click करा.
File > Save as.
Save as वर click केल्याने, “ Save As ” window उघडेल.





चरण 4: - File Save करता तेव्हा लक्षात ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेतः

" .html " HTML File extension वापरा, उदाहरणार्थ " index.html ". File extension हा file नावाचा प्रत्यय असतो आणि तो file च्या प्रकाराचे वर्णन करतो.

File नावामध्ये कोणतीही मोकळी जागा किंवा विशेष चिन्ह ( !, @, #, $, %, ^, &, * ) वापरू नका. त्याऐवजी अंडरस्कोर ( _ ) किंवा डॅश ( - ) वापरा.


File चे नाव “index.html” आणि encoding “UTF-8” ठेवा.




चरण 5: - HTML Document ला web browser मधे पाहणे.

Save केल्यावर HTML file अशी दिसेल.






पाहण्यासाठी save केलेले HTML file वर double-click (मागो- माग दोनवेळा) click करा किंवा mouse वर right-click करून "open with" मध्ये आवडत्या web browser निवडा.
  

टीप: -  सुरुवातीस, HTML चे code लिहिण्यासाठी notepad चा वापर केला पाहिजे ज्यामुळे आपल्याला HTML चे सर्व tags , elements  आणि attributes समजण्यास आणि लक्षात ठेवण्यास मदत होऊ शकते.


Html document चे वर्णन: -

<!DOCTYPE html>: <!DOCTYPE html>असे नमूद करते की हे document, html 5 शी संबंधित आहे.

<html>: html element, document ला   परिभाषित करतो.

<head>:<head> element document बद्दल माहिती प्रदान करतो.

<title>: <title> element, document लाशीर्षक प्रदान करतो.

<body>:<body> element, webpage मध्ये दिसणारे सामग्री असते.

<h1>:<h1>मजकूर चा स्वरूप ठळक आणि आकार परिभाषित करतं.










Post a Comment

Previous Post Next Post