HTML Quotation


HTML मध्ये quotation elements चा वापर webpage मध्ये मजकूर ला अवतरण चिन्ह मध्ये घालण्यासाठी केला जातो, म्हणजेच webpage मधील सामान्य मजकुरापेक्षा भिन्न प्रस्तुत करण्यासाठी वापरतो.

खाली HTML चे सर्वात वापरले जाणारे Quotation Element आहेत : -


<q> element : -

या element चा उपयोग अवतरण चिन्ह (" ") देण्यासाठी होतो.

वाक्यरचना : -

<q> मजकूर </q>


Code : -

<!DOCTYPE html>

<html>

<body>

<q>HTML is invented by Tim Berners-Lee</q>

</body>

</html>


Browser मध्ये code चे निष्कर्ष : -




<blockquote> element: -

HTML मध्ये <blockquote> element लांबीचे quotation दर्शविण्यासाठी वापरला जातो (म्हणजे एकाधिक ओळींना किंवा परिच्छेद विस्तृत करणारे quotation).


हा element ओळी किंवा परिच्छेदला अवतरण चिन्ह मध्ये  ठेवण्याऐवजी तो ओळी किंवा परिच्छेदचे संरेखन  इतरांपेक्षा वेगळी परिभाषित करतो.


वाक्यरचना : -

 <blockquote>ओळीला किंवा परिच्छेद </blockquote>


Code : -

<!DOCTYPE html>

<html>

<body>

<p>Here is a quote from WWF's website:</p>

<blockquote>

For 50 years, WWF has been protecting the future of nature.

The world's leading conservation organization,

WWF works in 100 countries and is supported by

1.2 million members in the United States and

close to 5 million globally.

</blockquote>

</body>

</html>



Browser मध्ये code चे निष्कर्ष : -




<abbr> element: -

<abbr> element एखादा मोठा वाक्याचा लहान स्वरूपाला परिभाषित करता. याच सह title attribute चा  वापर होतो.


वाक्यरचना : -

<abbr title= “Hyper Text Markup Language”>

HTML is invented by Tim Berners-Lee 

</abbr>


 उदा. 

HTML हा Hyper Text Markup Language चं लाहान स्वरूप आहे. जेव्हा आपण webpage मध्ये HTML वर cursor ठेवतो तेव्हा browser, html ची संपूर्ण नाव प्रदर्शित करतो.


Code : -

<!DOCTYPE html>

<html>

<body>

<h2><abbr title="Hyper Text Markup Language">HTML</abbr> is invented by Tim Berners-Lee</h2>

</body>

</html>



Browser मध्ये code चे निष्कर्ष : -






<cite> element: -

या element चा वापर आपल्या कार्याचा शीर्षकला ओळखण्यासाठी केला जातो. उदा . पुस्तक, गाणे, चित्रपट, टीव्ही शो, चित्रकला, आणि इतर. 

हा element शीर्षकाचा मजकूर ला webpage वर Italic font style मध्ये प्रदर्शित करते.

 

वाक्यरचना : -

 <cite>…..</cite>


टीप : -

cite element आणि blockquote मधील cite attribute दोन्ही वेगळे आहे आणि त्यांचा वापर ही वेगळा आहे.


Code : -


<!DOCTYPE html>

<html>

<body>

<p><cite>Natsamrat</cite>, a play written by V.V. Shirwadkar for which he won several accolades</p>

</body>

</html>


Browser मध्ये code चे निष्कर्ष : -





<bdo> element: -

bdo (Bi-directional Override) element चा वापर शब्दांचीवर्तमान ची दिशा बदलण्यासाठी वापरला जातो. 

आपण शब्दांची दिशा डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे बदलूशकतो.


यात dir (direction) attribute वापरला जातो. ज्याची दोन value आहे.


१) ltr (Left to Right) : शब्दांची दिशा डावीकडून उजवीकडे बदलण्यासाठी.


२) rtl (Right to Left) शब्दांची दिशा उजवीकडून डावीकडे बदलण्यासाठी.


वाक्यरचना : -

<bdo dir= “rtl”> </bdo>



Code : -

<!DOCTYPE html>

<html>

<body>

<h4>डावीकडून उजवीकडे. </h4>

<bdo dir= “ltr”>Hello World! </bdo>

<h4> उजवीकडून डावीकडे. </h4>

<bdo dir= “rtl”>Hello World! </bdo>

</body>

</html>


Browser मध्ये code चे निष्कर्ष : -






 


Post a Comment

Previous Post Next Post